💡💡💡💡💡💡💡
🎯उपक्रमाचे नाव-शब्दफुले.
इयत्ता -- चौथी ते सातवी
चला चला शब्दफुले वेचूया
छान छान हार बनवूया
एका हारात दहा दहा फुले घेऊया
सर्वात जास्त हारा कोणाचे ते पाहूया .
👉साहीत्य - शब्द टोपली.
(शब्द टोपली मध्ये पेपर डिश वर लिहलेले जोडाक्षर-स्त, त्र ,ज्ञ ,श्र ,श्व ,क्ष ,स्म ,स्व ,ष्ट्र, न्य, क्य, श्य ,पृ ,च्च ,च्छ ,ध्द, ध्य ,भ्य ,ख्य, व्य ,र्य, म्ह ,ऑ ,ग्य, ज्य ,डॉ ,स्त ,ष्ण ,न्न ,स्प, ष्ट , ल्ह ,स्थ, प्र, द्र ,अॅ ,र्या , ब्द ,र्म ,ग्र ,त्त ,व्ह, ल्प इत्यादी.
👉कृती- प्रथम शब्द टोपलीतील अक्षरांचे डिश सर्व विद्यार्थ्यांना वाटायचे .नंतर त्यांच्या जवळील डिश वरील जोडाक्षर शब्दात येईल असे शब्द लिहणे. स्वतःला माहीत असणारे शब्द तर लिहतीलच पण त्याचबरोबर पाठ्यपुस्तके आणि अंवातर वाचनाची पुस्तके वाचून त्यामधील शब्दांचा ही संग्रह करतील.
विद्यार्थ्याने दहा दहा शब्दांचे गट बनवायचे. ज्याचे सर्वात जास्त( गट)-हार तयार होतील तो विद्यार्थी जिंकला .त्याचे बक्षीस म्हणजे दुसर्या दिवशी तो विद्यार्थी दिवसभर अभ्यासमंत्री हे पद भुषविणार.
शब्दफुले-श्र-1 श्रावण ,श्राव्य ,श्री ,श्रीमती, श्रीमंत श्रद्धा श्रीकांत श्रीकृष्ण श्रीवास्तव श्रीलंका .2 श्रीराम ,श्रीकर ,श्राद्ध ,श्रेय , श्रीरामपूर, श्रेष्ठ ,श्रुती ,श्रुतलेखन ,श्रम ,श्रीधर .3 श्रीधरन ,श्रीशांत ,श्रीशैल, श्रीश ,श्रेयस ,श्रेणीत, श्रेयस्कर ,श्रेष्ठतम ,श्रेष्ठत्व ,श्रेणीतील. 4 श्रेष्ट, श्रोताओ ,श्रोत ,श्रोतागण, श्रोता ,श्रमिक , श्रमण, श्रमदान ,श्रमात ,श्रमातून .5 श्रमपरिहार, श्रमप्रद , श्रियाळ ,श्रीमान ,श्रृंगार ,श्रृंखला, श्रृंगेरी ,श्रृंगारित, श्रृंगी ,अश्रु .6 झ आश्रम ,आश्रय, आश्रित ,श्रावण ,श्रवणकुमार, श्रवणीय , श्रवण ,श्रावणमासी, श्रध्दानंद ,श्रद्धेवर .7 श्रद्धावान, शंभूश्री ,विजयश्री ,जयश्री ,श्रीदेवी, श्रीधाम, श्रीमद्भागवत, राजश्री ,राजाश्रय ,राजेश्वर .8 राजेश्वर ,श्रीया ,श्रीयुत ,श्रीयंत्र ,श्रवणभक्ती, श्रव्य ,श्रवणबैळगाव ,वीरश्री ,गजश्री, भाग्यश्री .9 श्रावणी ,श्रावक ,श्रावणीला, श्रावणाची, श्रीमहाराज, श्रीमंती, श्रीमुखात, श्रीखंड, श्रीखंडे ,श्रखंला. 10 श्रीगणेश ,श्रीगजानन, श्रीचंद, श्रीनगर ,श्रद्धेय ,श्राप ,श्राॅफ, श्रमसाध्य ,श्री, इत्यादी.
दुसर्या डावासाठी किंवा दुसरे कार्ड घेण्यासाठी पात्रता कमीत कमी दहा शब्द शोधणे.
👉उपक्रमाचे फायदे-
1 शब्दसंग्रह वाढतो.
2 जोडशब्द वाचण्याचा सराव होतो.
3जोडशब्द लिहण्याचा सराव होतो.
4 वाचनाची गती वाढते.
5 जोडशब्दासारखा किल्ष्ट घटक हसत खेळत शिकतात.
6 अवांतर वाचनाची सवय लागते.
7 परिसरातील दुकानावरील पाट्यांचे वाचन आर्वजून करतात.
8 आकलन युक्त वाचनाची सवय लागते.
9 श्रुतलेखनात सुधारणा होते.
शब्द टोपली मध्ये स्वर,व्यंजन ,बाराखडीतील कोणतेही अक्षर आपण घेऊ शकतो.
👉इंग्रजी -✏a,e, i ,o, u,या स्वराने सुरू होणारे words.
✏ ll ,ff ,ay ,ly, ow ,ew ,ue, ck ,in, ut, pt, ght ,est , ful ,st ,er , y ,es, sh , ess, th ,in at ने शेवट होणारे words.
✏st ,sm ,sn ,cl ,sch ,ps ,kn इत्यादी पासून सुरू होणारे words.
👉गणित -संख्या टोपली मध्ये
1ते100 संख्या कार्ड.
👉कृती -वरील खेळाप्रमाणे
(1-हे अंक असणाऱ्या तीन, चार ,पाच ,सहा, सात. ........अंकी संख्या तयार करणे.2 -तयार संख्यांमधील अंकाची स्थानिक किंमत सांगणे .3 -एका गटातील संख्याचा चढता उतरता क्रम सांगणे.)
👉समाजशास्त्र -शब्द टोपली
(राजधान्या, नद्या, पर्वत, शिखरे,खनिजे, देश,अभयारण्य, धातू,पर्यटन स्थळे, वनस्पती, प्राणी, धरणे, इत्यादी शब्द कार्ड.)